जानकीबाई प्रेमसुख झंवर मराठी शाळा ही सातारा जिल्ह्यातील एक प्रतिष्ठित अशी शाळा आहे. १९६९ साली स्थापन झालेली ही शाळा गेल्या अनेक दशकांपासून उच्च दर्जाचे शिक्षण देऊन समाजाच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. २०१८-१९ मध्ये आम्ही आमचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे केले. स्त्री शिक्षणातून स्त्री सबलीकरणाचे कार्य करणाऱ्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने सातारा आणि परिसरातील मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून ११ जून १९६९ रोजी १ ली ते ४ थी पर्यंतची जानकीबाई प्रेमसुख झंवर मराठी शाळेची स्थापन केली
विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार आणि मूल्याधिष्ठित शिक्षण देऊन समाजात आदर्श नागरिक घडवणे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून त्यांना आत्मनिर्भर, जबाबदार आणि सुसंस्कृत बनवणे. नवीन तंत्रज्ञानासोबत पारंपरिक संस्कृतीचा संगम घडवून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे.
प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये सुप्त असलेल्या गुणांना वाव देऊन त्यांचा सर्वांगीण विकास साधणे. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी घडवून राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात हातभार लावणे.
गणेश उत्सव
शाळेमध्ये शनिवार दिनांक ५ सप्टेंबर २०२६ रोजी गोपाळकाला निमित्त 'पुस्तक हंडी' मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. इयत्ता १ ली व दुसरी च्या विद्यार्थ्यांनी नृत्य अविष्कार तसेच तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाची गवळण यांचे सादरीकरण केले.शाळेच्या मुख्याध्यापिका मा.श्रीम.सुरेखा जाधव यांनी या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
जानकीबाई प्रेमसूख झंवर मराठी शाळा सातारा येथे शनिवार दिनांक ५ सप्टेंबर २०२६ रोजी शिक्षक दिन निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारं संपन्न झाला. कार्यक्रमासाठी शाला समिती सदस्य मा.श्रीम.वैशाली देशपांडे मॅडम, मा. श्री. कांबळे सर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका मा. श्रीम. सुरेखा जाधव मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले.
जानकीबाई प्रेमसुख झंवर मराठी शाळा सातारा येथे बुधवार दिनांक २९ जुलै २०२६ रोजी गुरुपौर्णिमेचा कार्यक्र मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमासाठी शाला समिती सदस्य मा.श्री.कांबळे सर, मा.श्रीम. शशीताई शिंदे, मा.श्रीम.देशपांडे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. त्यामधील काही क्षणचित्रे. कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे बाया कर्वे व भारत मातेच्या प्रतिमा पूजनाने झाली.
शनिवार दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी शाळेमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी माजी सैनिक मा.श्री.जाधव साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाला समिती सदस्य मा. श्रीम. देशपांडे मॅडम,मा. श्रीम. कोल्हापुरे मॅडम व मा.श्री. कांबळे सर तसेच अरुणी विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका श्रीम. निवळे मॅडम या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.
प्रशालेमध्ये शुक्रवार दिनांक २४ जुलै २०२६ रोजी इयत्ता पहिली ते चौथी मधील बाल वारकऱ्यांचा दिंडी सोहळा मोठ्या उत्साहामध्ये पार पडला. शाळेच्या मुख्याध्यापिका मा.श्रीम. सुरेखा जाधव मॅडम यांनी पालखीचे पूजन केले. शालेय परिसरामध्ये बालचमुंची दिंडी हरिनामाच्या गजरामध्ये दुमदुमून निघाली. बाल वारकऱ्यांनी पालखी भोवती फेर धरून विठुरायाचा व हरिनामाचा गजर केला. मुलींनी व शिक्षकांनी फुगड्या घातल्या. या दिंडी सोहळ्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मा.श्रीम. सुरेखा जाधव मॅडम यांनी मार्गदर्शन केले. तसेच सर्व शिक्षक, शिक्ष
जागतिक योग दिनानिमित्त. शाळेमध्ये २० जून २०२६ रोजी सूर्यनमस्कार, योगासने व ओमकाराचे प्रात्यक्षिके घेण्यात आले. इयत्ता ४ थी च्या वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांकडून विविध प्रात्याक्षिके करून घेतली. शाळच्या मुख्याध्यापिका मा. श्रीम. सुरेखा जाधव यांनी या कार्यक्रमास मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थी,शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी हे योग दिनामध्ये सहभागी झाले होते.
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची जानकीबाई प्रेमसुख झंवर मराठी शाळा सातारा येथे सोमवार दिनांक १५ जून २०२६ रोजी शाळेमध्ये नवागतांचे स्वागत करण्यात आले .शाळेच्या प्रवेशद्वारापाशी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या पाऊलखुणांचे ठसे घेऊन औक्षण करून ढोल ताशांच्या गजरामध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले.
Copyright © 2025. Maharshi Karve Stree Shikshan Samstha, (MKSSS), Pune. All rights reserved
Powered by Sangraha