गुरुपौर्णिमा
जानकीबाई प्रेमसुख झंवर मराठी शाळा सातारा येथे बुधवार दिनांक २९ जुलै २०२६ रोजी गुरुपौर्णिमेचा कार्यक्र मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमासाठी शाला समिती सदस्य मा.श्री.कांबळे सर, मा.श्रीम. शशीताई शिंदे, मा.श्रीम.देशपांडे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. त्यामधील काही क्षणचित्रे. कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे बाया कर्वे व भारत मातेच्या प्रतिमा पूजनाने व आश्रम गीताने करण्यात आली.
इयत्ता चौथीचे विद्यार्थी व शिक्षकांनी गुरु शिष्याची महिमा आपल्या गोष्टी मधून सांगितली.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी ही आपले मनोगत व्यक्त करून सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.