नवागतांचे स्वागत

.

जानकीबाई झंवर शाळा सातारा    26-Sep-2026
Total Views |
 
 नवागतांचे स्वागत 
नवागतांचे स्वागत .
 
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची जानकीबाई प्रेमसुख झंवर मराठी शाळा सातारा येथे सोमवार दिनांक १५ जून २०२६ रोजी शाळेमध्ये नवागतांचे स्वागत करण्यात आले .शाळेच्या प्रवेशद्वारापाशी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या पाऊलखुणांचे ठसे घेऊन औक्षण करून ढोल ताशांच्या गजरामध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले.
   या शुभेच्छा समारंभासाठी शाला समिती सदस्या मा. श्रीम. देशपांडे मॅडम, मा.श्रीम. कोल्हापुरे मॅडम, मा. श्रीम. शिंदे मॅडम, मा. श्री. कांबळे सर* इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व खाऊचे वाटप करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका मा. श्रीम. सुरेखा जाधव मॅडम यांनी इयत्ता पहिलीच्या मुलांचे स्वागत केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.