शाळेविषयी अधिक माहिती

जानकीबाई झंवर शाळा सातारा    13-Sep-2025
Total Views |
   शाळेविषयी अधिक माहिती
 
 
स्त्री शिक्षणातून स्त्री सबलीकरणाचे कार्य करणाऱ्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने सातारा आणि परिसरातील मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून ११ जून १९६९ रोजी १ ली ते ४ थी पर्यंतची जानकीबाई प्रेमसुख झंवर मराठी शाळेची स्थापन केली.संस्थेच्या सातारा प्रकल्पामध्ये प्राथमिक शिक्षण उपलब्ध व्हावे, असा विचार करून संस्थेचे त्यावेळचे संचालक मंडळ सदस्य श्री.कृ.ग.टंकसाळे,श्री.बा.ग.लखापतीआणि श्री.पु.वि.गोळे यांच्या पुढाकाराने जानकीबाई प्रेमसुख झंवर मराठी शाळेची स्थापन करण्यात आली. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या झंवर कुटुंबीयांनी शाळेस उदार हस्ते देणगी देऊन मातृऋण जपले व आदर्श मराठी शाळेचे नामकरण 'जानकीबाई प्रेमसुख झंवर मराठी शाळा ' असे करण्यात आले.
    
   या शाळेने विविध स्पर्धा परीक्षा, गुणवत्तावाढ प्रकल्प इ. च्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षणास चालना देत शैक्षणिक पातळ्यांवर शाळेचे नाव उज्वल केलेले आहे. मागील अर्ध्या शतकात अनेक गुणवान माजी विद्यार्थिनींनी समाजात मोठे योगदान दिले आहे.शाळेतील शिक्षकांनी नेहमीच विद्यार्थ्यांच्या विकासात आणि त्यांना स्वयंपूर्ण बनविण्यात मोठे योगदान कायमच दिले आहे व पुढेही देत राहतील.
   
   शाळेतील विद्यार्थ्यांनी आय.टी. एस., मंथन सारख्या स्पर्धा  परीक्षांमध्ये तसेच वैयक्तिक व सांघिक खेळामध्ये उत्तुंग यश मिळवून शाळेचे नावलौकिक वाढविलेले आहे. शाळा विद्यार्थ्यांबरोबर पालकांनाही आपले कलागुण सादर करण्यासाठी विविध स्पर्धा ,व्याख्याने यांचे आयोजन करते, याचा उपयोग पालक व शाळा यातील संबंधांचे दृढीकरण होण्यासाठी होतो.सातारच्या शैक्षणिक जीवनात आपल्या संस्थेचे योगदान मोलाचे आहे. अनेक सुसंस्कृत पिढ्या घडविण्याचे कार्य शाळेकडून झाले आहे. हे कार्य यापुढेही अखंडपणे चालू राहील.