गणेशोत्सव

१४ सप्टेंबर २०२६ रोजी शाळेमध्ये श्री गणेशाची प्रतिष्ठापना ढोल ताशांच्या गजरामध्ये अत्यंत उत्साहात आणि मंगलमय
वातावरणात शाला समिती सदस्य श्री. अनंत कांबळे सर यांच्या हस्ते करण्यात आली. या प्रसंगी सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर
कर्मचारी उपस्थित होते. शाळेमध्ये दरवर्षी दीड दिवस गणपती बाप्पाची मनोभावे सेवा केली जाते. या दीड दिवसांत विद्यार्थी
अथर्वशीर्ष, गणपती स्तोत्र, श्लोक आणि भक्तीगीतांच्या माध्यमातून बाप्पाची आराधना करतात.