शालेय सुविधा
जानकीबाई झंवर शाळा सातारा 03-Sep-2025
Total Views |
शालेय सुविधा
-
तज्ञ व उत्तम मार्गदर्शक शिक्षक वृंद
- विद्यार्थ्यांना अध्यन , त्यांचा सर्वांगीण विकास , उत्तम संस्कार , अष्टपैलू व्यक्तिमत्व घडविण्यासाठी तज्ञ व उत्तम मार्गदर्शक शिक्षक वृंद शाळेमध्ये कार्यरत आहे . विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी शाळेमध्ये वेळोवेळी विविध उपक्रम व कृतीशील कार्यक्रम राबविले जातात.
होते.
-
आरोग्यपूर्ण स्वच्छतेची परिपूर्ण दक्षता
- विद्यार्थ्यांना स्वच्छ व शुद्ध पाण्याची उपलब्धता एक्वागार्डद्वारे करण्यात आलेली आहे. पाण्याच्या मुबलकतेमुळे पिण्याचे पाणी व वापरावयाचे पाणी याची टंचाई भासत नाही.विद्यार्थ्यांनाआरोग्यपूर्ण वातावरण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शाळेमध्ये पूर्णवेळ सफाई कर्मचारी कार्यरत आहेत.
-
२४ तास सुरक्षा रक्षक
- विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळेमध्ये २४ तास सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थी यांच्यामध्ये सुरक्षिततेची भावना वृद्धिंगत होण्यास मदत होते.
- स्मार्ट बोर्ड सुविधा - आत्ताच्या डीजीटल युगाचा विचार करता शाळेमध्ये विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्राचा वापर करून म्हणजेच स्मार्ट बोर्डचा वापर करून वर्गामध्ये अध्यापन केले जाते.
- प्रशस्त वर्ग व बेंचेसची सुविधा - इयत्ता १ ली ते ४ थी मधील सर्व वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वयोगटानुसार बेंचेसची सुविधा प्राप्त करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेची उत्तम सोय झालेली आहे. बेंचेसच्या उपलब्धतेमुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर चांगला परिणाम झालेला पहावयास मिळतो.
- सुसज्ज संगणक लॅब - इतर विषयांबरोबर ई-लर्निंग चे शिक्षण देण्यासाठी सर्व सोयींनीयुक्त सुसज्ज अशा संगणक लॅबची व्यवस्था करण्यात आलेली आहे. लॅबमध्ये एकूण २० संगणक आहेत. एका विद्यार्थ्यास एक संगणक हाताळण्यास उपलब्ध करून दिला जातो.
- सेमी इंग्लिश माध्यम - पुढील माध्यमिक शिक्षणाच्या दृष्टीने गणित विषयाची इंग्रजीमधून ओळख होण्यासाठी गणित हा विषय सेमी इंग्रजीमधून घेतला जातो. त्यामुळे सेमी माध्यमाचा उपयोग त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी उपयुक्त व सुकर ठरेल.
- प्राथमिक शाळा इयत्ता १ ली ते ४ थी. एकूण ८ वर्ग खोल्या - शाळेमध्ये ८ प्रशस्त व हवेशीर वर्गखोल्यांसह विविध कार्यक्रम व उपक्रमांसाठी मोठे सभागृह आहे. बेंचेससह उत्तम बैठकव्यवस्था वर्गामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. प्रशस्त खिडक्यांमुळे वर्गखोल्यांमध्ये भरपूर प्रकाश व हवा खेळती राहण्यास मदत होते.
-
बोलक्या भिंती- शालेय प्रवेशद्वारापाशी वातावरण
निर्मितीसाठी आकर्षक बोलक्या भिंतींची निर्मिती करण्यात आलेली आहे.
त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळे व आकर्षक चित्रांचा
समावेश करण्यात आलेला आहे.
-
विज्ञान व क्रीडा साहित्य- शाळेमधील प्रयोग
शाळेमध्ये विद्यार्थ्यांना विविध प्रयोग सादरीकरणासाठी मुबलक असे विज्ञान साहित्य उपलब्ध आहे.
विद्यार्थ्यांना विविध खेळांची ओळख व आवड निर्माण होण्यासाठी मुबलक
प्रमाणात क्रीडा साहित्य उपलब्ध आहे. शालेय क्रीडा मेळावा व राष्ट्रीय
सणांमध्ये क्रीडा साहित्याचा वापर सादरीकरणासाठी केला जातो.
-
पिण्याचे पाणी - विद्यार्थ्यांना स्वच्छ व शुद्ध पाण्याची उपलब्धता एक्वागार्डद्वारे करण्यात आलेली आहे. पाण्याच्या मुबलकतेमुळे पिण्याचे
पाणी व वापरावयाचे पाणी याची टंचाई भासत नाही.
-
रॅम्पची सुविधा-शारीरिकदृष्ट्या अपंग विद्यार्थ्यांसाठी
शाळेत ये-जा करण्यासाठी रॅम्पची सुविधा करण्यात आलेली आहे.
-
ग्रंथालय- विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागण्यासाठी
शाळेमध्ये प्रशस्त असे स्वतंत्र ग्रंथालय उपलब्ध करून देण्यात आलेले
आहे. ग्रंथालयामध्ये गोष्टींची व बालगीतांची तसेच थोर महापुरुषांची
चरित्रे, नाटके इ. पुस्तके उपलब्ध आहेत.शिक्षकांचे अध्यापन प्रभावी
होण्यासाठी मार्गदर्शनपर पुस्तकांचा समावेश ग्रंथालयामध्ये करण्यात आलेला आहे.
-
गरजू व होतकरू
विद्यार्थ्यांना आर्थिक मदत- संस्थेकडून गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले जाते. त्यामध्ये शालेय गणवेश, बूट, शालेय साहित्य या गोष्टींचा समावेश असतो. तसेच संस्थेकडून दाननिधीच्या स्वरुपात गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत
केली जाते.