आरोग्यपूर्ण स्वच्छतेची परिपूर्ण दक्षता
विद्यार्थ्यांना निरोगी व आरोग्यपूर्ण वातावरण देण्यासाठी शाळा प्रशासन कटिबद्ध आहे.'अॅक्वागार्ड' द्वारे स्वच्छ व शुद्ध पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय करण्यात आलेली आहे. पाण्याच्या मुबलकतेमुळे पिण्याचे पाणी व वापरावयाचे पाणी याची टंचाई शाळेमध्ये भासत नाही.विद्यार्थ्यांनाआरोग्यपूर्ण वातावरण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शाळेमध्ये पूर्णवेळ सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. जे शाळा परिसर नेहमी स्वच्छ ठेवतात.