सुसज्ज व प्रशस्त वर्गखोल्या
शाळेमध्ये ८ प्रशस्त व हवेशीर वर्गखोल्यांसह विविध कार्यक्रम व उपक्रमांसाठी मोठे सभागृह आहे. बेंचेससह उत्तम बैठकव्यवस्था वर्गामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. प्रशस्त खिडक्यांमुळे वर्गखोल्यांमध्ये भरपूर प्रकाश व हवा खेळती राहण्यास मदत होते.