बाल वारकरी दिंडी सोहळा

जानकीबाई झंवर शाळा सातारा    26-Sep-2026
Total Views |
 बाल वारकरी दिंडी सोहळा
 
बाल वारकरी दिंडी सोहळा.
 प्रशालेमध्ये शुक्रवार दिनांक २४ जुलै २०२६ रोजी इयत्ता पहिली ते चौथी मधील बाल वारकऱ्यांचा दिंडी सोहळा मोठ्या उत्साहामध्ये पार पडला. शाळेच्या मुख्याध्यापिका मा.श्रीम. सुरेखा जाधव मॅडम यांनी पालखीचे पूजन केले.शालेय परिसरामध्ये बालचमुंची दिंडी हरिनामाच्या गजरामध्ये दुमदुमून निघाली. बाल वारकऱ्यांनी पालखी भोवती फेर धरून विठुरायाचा व हरिनामाचा गजर केला. मुलींनी व शिक्षकांनी फुगड्या घातल्या.
   या दिंडी सोहळ्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मा.श्रीम. सुरेखा जाधव मॅडम यांनी मार्गदर्शन केले. तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्ग या दिंडीमध्ये सहभागी झाले होते.