शिक्षक दिन

जानकीबाई झंवर शाळा सातारा    26-Sep-2026
Total Views |
 शिक्षक दिन

पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती उत्तीर्ण विद्यार्थी सत्कार समारंभ
जानकीबाई प्रेमसूख झंवर मराठी शाळा सातारा येथे शनिवार दिनांक ५ सप्टेंबर २०२६ रोजी शिक्षक दिन निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारं संपन्न झाला. कार्यक्रमासाठी शाला समिती सदस्य मा.श्रीम.वैशाली देशपांडे मॅडम, मा. श्री. कांबळे सर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका मा. श्रीम. सुरेखा जाधव मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले.
   सन २०२५-२६ पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शाळेकडून अभिनंदन पत्र देऊन सत्कार करण्यात आला.तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी पालक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.