श्रावणी शुक्रवार -सांस्कृतिक उपक्रम
शाळेमध्ये शुक्रवार दिनांक ४ सप्टेंबर २०२६ रोजी 'श्रावणी शुक्रवार' निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. आपल्या
परंपरा, सण आणि संस्कृतीची ओळख करून देण्याकरिता हा उपक्रम दरवर्षी शाळेमध्ये घेतला जातो. शाळेतील उपशिक्षिका
श्रीम. जंगम मॅडम यांनी विद्यार्थ्यांना श्रावणी शुक्रवारचे महत्व व गोष्ट सांगितली. सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण केले व
त्यानंत खाऊचे वाटप करण्यात आले.