स्वातंत्र्य दिन
शनिवार
दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी शाळेमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी माजी सैनिक मा.श्री.नंदकुमार जाधव साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाला समिती सदस्य मा. श्रीम. देशपांडे मॅडम,मा. श्रीम. कोल्हापुरे मॅडम व मा.श्री. कांबळे सर तसेच अरुणी विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका श्रीम. निवळे मॅडम या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. कार्यक्रमांमध्ये इयत्ता चौथी मधील विद्यार्थ्यांनी रिंग कवायत, बैठे व उभे कवायत प्रकारांचे सादरीकरण केले.शाळेच्या मुख्याध्यापिका मा. श्रीम.सुरेखा जाधव यांनी या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते.