बाल वारकरी दिंडी सोहळा

जानकीबाई झंवर शाळा सातारा    29-Aug-2025
Total Views |
बाल वारकरी दिंडी सोहळा 
 
 
शनिवार दिनांक ५ जुलै २०२५ रोजी प्रशालेमध्ये इयत्ता पहिली ते चौथी मधील बाल वारकऱ्यांचा दिंडी सोहळा मोठ्या उत्साहामध्ये पार पडला. शाळेच्या मुख्याध्यापिका मा.श्रीम. सुरेखा जाधव मॅडम यांनी पालखीचे पूजन केले.शालेय परिसरामध्ये बालचमुंची दिंडी हरिनामाच्या गजरामध्ये दुमदुमून निघाली तसेच आरत्या, भजन, अभंग, घोषणा यांनी सर्व परिसर भक्तिमय झाला. बाल वारकऱ्यांनी पालखी भोवती फेर धरून विठ्ठल विठ्ठल व हरिनामाचा गजर केला.