जागतिक योग दिन

जानकीबाई झंवर शाळा सातारा    28-Aug-2025
Total Views |

जागतिक योग दिन 

 
 
जागतिक योग दिनानिमित्त. शाळेमध्ये २० जून २०२५ रोजी व २१ जून २०२५ या दोन दिवशी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले.शुक्रवार दिनांक २० जून २०२५ रोजी श्रीम. अर्चना राजगुरू व श्रीम. भारती उपाध्याय यांनी सूर्यनमस्कार व ओमकाराचे प्रात्यक्षिके विद्यार्थी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून करवून घेतली.शनिवार दिनांक २१ जून २०२५ रोजी शाला समिती सदस्या मा. श्रीम. श्वेता कोल्हापुरे व त्यांच्या सहकारी यांनी विविध योगासनांचे मार्गदर्शन विद्यार्थी व शिक्षकांना केले. शाळेच्या मुख्याध्यापिका,शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी योग दिनामध्ये सहभागी झाले होते.