बाल वारकऱ्यांचा दिंडी सोहळा

14 Aug 2025 11:31:43
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची
जानकीबाई प्रेमसूख झंवर मराठी शाळा सातारा
“बाल वारकऱ्यांचा दिंडी सोहळा”
      
 
शनिवार दिनांक ५ जुलै २०२५ रोजी प्रशालेमध्ये इयत्ता पहिली ते चौथी मधील बाल वारकऱ्यांचा दिंडी सोहळा मोठ्या उत्साहामध्ये पार पडला. शाळेच्या मुख्याध्यापिका मा.श्रीम. सुरेखा जाधव मॅडम यांनी पालखीचे पूजन केले.
शालेय परिसरामध्ये बालचमुंची दिंडी हरिनामाच्या गजरामध्ये दुमदुमून निघाली तसेच आरत्या, भजन, अभंग, घोषणा यांनी सर्व परिसर भक्तिमय झाला. बाल वारकऱ्यांनी पालखी भोवती फेर धरून विठ्ठल विठ्ठल व हरिनामाचा गजर केला. मुलींनी व शिक्षकांनी फुगड्या घातल्या.या दिंडी सोहळ्यासाठी शाळेच्या मुध्यापिका मा.श्रीम. सुरेखा जाधव मॅडम यांनी मार्गदर्शन केले. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग या दिंडीमध्ये सहभागी झाला होता.
Powered By Sangraha 9.0