नवागतांचे स्वागत

13 Aug 2025 08:52:03

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची

जानकीबाई प्रेमसुख झंवर मराठी शाळा सातारा

नवागतांचे स्वागत ”

    सोमवार दिनांक १६ जून २०२५ रोजी शाळेमध्ये नवागतांचे स्वागत करण्यात आले. शाळेच्या प्रवेशद्वारापाशी इयत्ता १ली च्या विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टी करून व फूल देऊन तसेच पाऊलखुणांचे ठसे घेऊन ढोल ताशांच्या गजरामध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले.या शुभेच्छा समारंभासाठी शाला समिती सदस्या मा. श्रीम. देशपांडे मॅडम या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
   इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून पाठ्यपुस्तके देऊन खाऊचे वाटप करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका मा. श्रीम. सुरेखा जाधव मॅडम यांनी इयत्ता पहिलीच्या मुलांचे स्वागत केले व शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमामध्ये सहभागी होते.
Powered By Sangraha 9.0