जानकीबाई प्रेमसुख झंवर शाळेबद्दल

02 Jul 2025 15:06:11

jhawar school
 
 
स्त्री शिक्षणातून स्त्री सबलीकरणाचे कार्य करणाऱ्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने सातारा आणि परिसरातील मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून ११ जून १९६९ रोजी १ ली ते ४ थी पर्यंतची जानकीबाई प्रेमसुख झंवर मराठी शाळेची स्थापन केली. संस्थेच्या सातारा प्रकल्पामध्ये प्राथमिक शिक्षण उपलब्ध व्हावे, असा विचार करून संस्थेचे त्यावेळचे संचालक मंडळ सदस्य श्री.कृ.ग.टंकसाळे,श्री.बा.ग.लखापती आणि श्री.पु.वि.गोळे यांच्या पुढाकाराने जानकीबाई प्रेमसुख झंवर मराठी शाळेची स्थापन करण्यात आली.
 
या शाळेने विविध स्पर्धा परीक्षा, गुणवत्तावाढ प्रकल्प इ. च्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षणास चालना देत शैक्षणिक पातळ्यांवर शाळेचे नाव उज्वल केलेले आहे. मागील अर्ध्या शतकात अनेक गुणवान माजी विद्यार्थिनींनी समाजात मोठे योगदान दिले आहे.
शाळेतील शिक्षकांनी नेहमीच विद्यार्थ्यांच्या विकासात आणि त्यांना स्वयंपूर्ण बनविण्यात मोठे योगदान कायमच दिले आहे व पुढेही देत राहतील .
 
जानकीबाई प्रेमसुख झंवर मराठी शाळा ही सातारा जिल्ह्यातील एक प्रतिष्ठित शाळा आहे. शाळा गेल्या अनेक दशकांपासून उच्च दर्जाचे शिक्षण देऊन समाजाच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. २०१८-१९ मध्ये आम्ही आमचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे केले.
Powered By Sangraha 9.0