शिवजयंती
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची जानकीबाई प्रेमसुख मराठी शाळा सातारा येथे बुधवार दिनांक १८/२/२०२६ रोजी शिवजयंती मोठ्या उत्साहात पार पडली. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्र प्रदर्शन भरविले होते.यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची चित्रे, किल्ल्यांची चित्र,कोलाज इ. समावेश होता.
शाला समिती सदस्या मा.श्रीम.देशपांडे मॅडम यांनी या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन केले. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.त्याचबरोबर विद्यार्थ्यांना गोष्टही सांगितली व महाराजांच्या कोणत्या गुणांचे विद्यार्थ्यांनी अनुकरण करावे या विषयी मार्गदर्शन केले. इयत्ता ४ थी च्या वर्गशिक्षकांनी या कार्यक्रमासाठी विद्याथ्यांना मार्गदर्शन केले होते.हे प्रदर्शन पाहण्यासाठी सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी मित्र व पालक वर्ग ही मोठ्या संख्येने उपस्थित होता.