बालआनंद मेळावा

बालआनंद मेळावा

जानकीबाई झंवर शाळा सातारा    11-Apr-2026
Total Views |
 
बालआनंद मेळावा  
 
 महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची जानकीबाई प्रेमसुख मराठी शाळा सातारा, शनिवार दिनांक ३/१/२०२६ रोजी बाल आनंद मेळावा उत्साहात पार पडला. इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी स्टेशनरी, सौंदर्य प्रसाधने, खाऊ गल्ली, भाजी मंडई, वस्त्र दालन इत्यादी विभागांमध्ये विविध स्टॉल उभारले होते.
   विद्यार्थ्यांना खरेदी विक्रीच्या व्यवहाराचा या मेळाव्यामधून प्रत्यक्षपणे अनुभव घेता आला. विद्यार्थी, शिक्षक व पालकांनीही खरेदी करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. शाळेच्या मुख्याध्यापिका मा. श्रीम. सुरेखा जाधव मॅडम यांनी या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले होते.