टेबल टेनिस स्पर्धेत प्रशालेतील विद्यार्थिनीचे दैदिप्यमान यश
कोकण व पश्चिम महाराष्ट्र विभागीय टेबल टेनिस स्पर्धेत प्रशालेतील विद्यार्थिनी कु. श्रेया विजय माईन (इयत्ता ४ थी) हिने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत ११ वर्षांखालील मुलींच्या गटात विजेतेपदासह सुवर्णपदक , तर १३ वर्षांखालील मुलींच्या गटात कांस्यपदक मिळवले. दिनांक २ व ३ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या या विभागीय स्पर्धेत सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या आठ जिल्ह्यांतील उत्कृष्ट टेबल टेनिसपटूंनी सहभाग घेतला होता.
या विद्यार्थिनीस संग्राम राजेशिर्के टेबल टेनिस अकॅडमीचे प्रशिक्षक श्री. संग्राम सुरेश राजेशिर्के यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभत आहे. या उत्तुंग यशाबद्दल शाला समिती अध्यक्ष व सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक,क्रीडा अधिकारी आणि पालक अशा सर्व स्तरातून तिचे अभिनंदन व कौतुक होत आहे.