दीपोत्सव
जानकीबाई झंवर शाळा सातारा 15-Dec-2025
Total Views |
दीपोत्सव
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची जानकीबाई प्रेमसुख झंवर मराठी शाळा सातारा येथे बुधवार दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी शाळेमध्ये दीपोत्सव कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमामध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी बनविलेले भेटकार्ड, आकाश कंदील, आकर्षक पणत्यांचे प्रदर्शन हॉलमध्ये भरविले होते.कार्यक्रमासाठी शाला समिती अध्यक्ष मा. श्री. दत्ताजी थोरात साहेब यांची प्रमुख पाहुणे म्हूणन उपस्थिती लाभली. तसेच शाला समिती सदस्या मा. श्रीम. देशपांडे मॅडम व मा. श्रीम. काळे मॅडम व अरुणी विदयामंदिर च्या मुख्याध्यापिका मा. श्रीम. निवळे मॅडम कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.
इयत्ता चौथी मधील विद्यार्थ्यांनी दीपावलीच्या सर्व दिवसांचे महत्त्व कृतियुक्त सादर केले.याप्रसंगी दुसरी व तिसरीच्या विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे सादरीकरण केले.या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मा. श्रीम. सुरेखा जाधव मॅडम यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.